।। शिवपञ्चाक्षरस्तोत्रम् ।।

             ह्या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचे आद्याक्षर क्रमाने घेतल्यास `नमः शिवाय' हा पंचाक्षरी मंत्र तयार होतो. पहिल्या श्लोकातील ना ह्या  अक्षरा ऐवजी हे अक्षर घ्यावे तर  दुसर्या श्लोकाचे आद्याक्षर हे विसर्गासह घ्यावे.  चौथ्या श्लोकाचे आद्याक्षर चा वा करून घ्यावे. ह्या पंचाक्षरी मंत्राच्या सुरवातीला  लावल्यास  ' नमः शिवाय'  हा मंत्र तयार होतो.  ह्या मंत्रातील प्रत्येक अक्षर हे शिवस्वरूपच आहे.

Image result for lord shiva free download


(वृत्त  इंद्रवज्रा, अक्षरे 11, गण   )

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय  तस्मैकाराय नमः शिवाय ।।1

नन्दीश्वराच्या रुळतोच कंठी  नागेंद्र तो शेषचि हार रूपी
भाळावरी लोचन अग्निरूपी देही चिताभस्म विलेपिलेची।।1.1

अस्तित्व याचे नच नाश पावे संसार-धर्मे विकार पावे
दाही दिशा वस्त्रचि ज्या शिवाचे देवांमधे जो अति श्रेष्ठ आहे।।1.2

पंचाक्षरी मंत्र सदा जपूनी मी वंदितो देव काररूपी।।1.3



न्दाकिनीसलिलचन्दनचर्चिताय  नन्दीश्वरप्रमथनाथमहेश्वराय।
मन्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय  तस्मैकाराय नमः शिवाय ।।2

मन्दाकिनीच्याच जलाभिषेके ज्या पूजिले चंदन लेपनाने
मंदार पुष्पे, सुमने सुगंधी ज्या अर्पिली ती बहु देवतांनी।।2.1

स्वामी गणांचा शिव चंद्रमौळी। जो नंदिचाही  प्रभु शक्तिशाली
पंचाक्षरी मंत्र सदा जपूनी तो वंदितो देव काररूपी।।2.2



शिवाय गौरीवदनाब्जवृन्द-सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मैशिकाराय नमः शिवाय।।3

शीतांशुधारी शिव शांतरूपी पाहून गौरी मनि हर्षिते ही
तेजोनिधी भास्कर तो बघूनी उत्फुल्ल जैसी कमळे सुखानी।।3.1

तैसे तिचे नेत्र फुलून येती। डोले सुखाने मुखपद्म तेची
ऐसा उमेच्या खुलवी मनासी कल्याणकारी शिव जो असेची।।3.2

आरूढ नंदीवर जोचि राही जो दक्ष यज्ञा मिटवून टाकी
पंचाक्षरी मंत्र सदा जपूनी तो वंदितो देव शिकाररूपी।।3.3



वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य-मुनीन्द्रदेवार्चितशेखराय
चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय  तस्मैकाराय नमः शिवाय।।4

सिष्ठ, ते श्रेष्ठचि गौतमादि। कुंभातुनी जन्मति जे अगस्ती।
पूजी जया आर्य महामुनीही।  देवेंद्र पूजी चरणे जयाची।।4.1

तोची महादेव त्रिलोक स्वामी। डोळे जयाचे शशि, सूर्य, अग्नी
पंचाक्षरी मंत्र सदा जपूनी तो वंदितो देव काररूपी।।4.2




क्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मैकाराय नमः शिवाय।।5

यक्षस्वरूपी शिव हा असेची शोभे जटाजूट शिरी जयासी
पिनाकनामेचि धनुष्य हाती शोभेचि हा शाश्वत नित्य स्थायी।।5.1

आहेचि लोकोत्तर दिव्यदेही। नेसे महावस्त्र दिशा दहाही
पंचाक्षरी मंत्र सदा जपूनी तो वंदितो देव काररूपी।।5.2



पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते।।6


नम: शिवाय मंत्राचे पुण्य-स्मरण जो करे
शिवा जवळ बैसोनी। शिवासह सुखे वसे।।


श्री आद्य शंकराचार्ये रचिले स्तोत्र हे साचे
अनुवाद तयाचा हा अरुंधती करीतसे॥

------------------


1935, विजयनाम संवत्सर, आषाढ शुद्ध एकादशी, 19 जुलै,  2013

1 comment: