शंकरदेशिकाष्टकम् / तोटकाष्टकम्


स्तोत्राची पूर्वपीठिका - 
                              जगद्गुरू आद्य शंकराचार्य नित्यनियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना पाठ देण्यासाठी बसले होते. शिकवायला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी सर्व शिष्यांवरून नजर फिरवली तेंव्हा त्यांना त्यांचा गिरी नावाचा शिष्य दिसला नाही. त्यामुळे आचार्य त्याची वाट बघत थांबले. गिरी मनःपूर्वक आचार्यांची छाटी धूत होता. सर्व शिष्यही आतुरतेने आचार्य काय शिकविणार याची वाट बघत होते. शेवटी आचार्यांचे एक बुद्धीमान शिष्य पादपद्म म्हणाले, ``आचार्य,! सर्वजण तर उपस्थित आहेत. आपण कोणाची वाट पहात आहात?'' आचार्य हसून म्हणाले `` अजून आपला गिरी तर नाही आला.'' पद्मपादांना त्यांच्या विद्वत्तेचा मोठा अहंकार होता. ते म्हणाले ``आचार्य, गिरी ऊपस्थित असला काय नसला काय. त्याला काहीच कळत नाही.'' तेवढ्यात गिरी तेथे आला. आचार्यांना नमस्कार करून तो बसणार एवढ्यात आचार्य त्याला म्हणाले ``गिरी आजचा पाठ तू घे.'' सर्वजण आश्चर्याने पाहू लागले कारण गिरी हा सर्वात मंदबुद्धी शिष्य होता. आचार्यांवर अनन्य श्रद्धा असलेल्या गिरीने मात्र पाठ घेण्यास सुरवात केली. आणि काय आश्चर्य! त्याचं अज्ञान मावळून सरस्वती त्यावर प्रसन्न झाली. अत्यंत नम्रपणे आणि भक्तिूर्ण अंतःकरणाने त्याने आचार्यांची स्तुती म्हणण्यास प्रारंभ केला. कारुण्यरसाने ओथंबलेले स्तोत्र म्हणत असतांना त्याचा कंठ सद्गदित होत होता. त्याच्या नेत्रातून अश्रूधारा वाहत होत्या. त्यानंतर त्या दिवसाचा पाठ सांगून त्याने आचार्यांची आज्ञा पूर्ण केली. त्याने तोटक वृत्तात स्तोत्र आणि पाठ सांगितल्यामुळे आचार्य गमतिने त्याला तोटकाचार्य म्हणालेपुढे तो त्याच नावाने प्रसिद्ध झाला. त्या वेळेस तोटक वृत्तातील त्याचे हे शंकरदेशिकाष्टकम् (अध्यात्मातील गुरूला देशिक म्हटले जाते) अथवा तोटकाष्टकम्

 Image result for free download images of adi shankaracharya
शंकरदेशिकाष्टकम् / तोटकाष्टकम्

(वृत्त - तोटक, अक्षरे -12, गण- )

विदिताखिलशास्त्रसुधाजलधे  महतोपनिषत्कथितार्थनिधे।
हृदये कलये विमलं चरणं भव शंकर देशिक मे शरणं ।।1

निगमार्थ सुधेसम ज्ञात तुम्हा तव ज्ञान अथांग समुद्रसमा
निगमार्थचि उज्ज्वल सूक्ष्म असा। जगता कथिला अति दिव्य असा।।1.1
पदपंकज हे तव वंद्य मला। हृदयात  वसो नित ते अमला
पथदर्शक सद्गुरुराज महा। मम शंकर सद्गुरु आश्रय व्हा  ।। 1.2



करुणावरुणालय पालय मां। भवसागरदुःखविदूनहृदम्
रचयाखिलदर्शनतत्त्वविदं। भव शंकर देशिक मे शरणम् ।। 2
वरुणालय  सागर
भवसागर हा अति दुःखभरा मम चित्त विदीर्ण करी शतदा
करुणानिधि आपण एक मला। भवसागर तारुनि न्या मजला।।2.1
बहु अज्ञ असे कळते मला शास्त्र वेद ब्रह्म महा
मनि ज्ञान सुदीपचि लावुनिया   उजळा हृदयी मम ज्ञानप्रभा।।2.2
मज वेद विशारद तज्ञ करा। मज दर्शनशास्त्र प्रवीण करा
पदपंकज हे तव वंद्य मला। मम शंकर सद्गुरु आश्रय व्हा  ।।2.3



भवता जनता सुहिता भविता निजबोधविचारणचारुमते
कलयेश्वरजीवविवेकविदं  भव शंकर देशिक मे शरणम् ।।3

(विचारणम् - चर्चा,चिंतन,परीक्षा,पर्यालोचन,अन्वेषण )
हितचिंतक आपण ह्या जगता सुपथावर चालविण्या जगता
निजबोधअनाकलनीय असा उकलून सुबोध करी सहजा।।3.1
मजजीव शिवातचि ऐक्य घडे असलाचि विवेक प्रभो नित द्या
पदपंकज हे तव वंद्य मला। मज शंकर सद्गुरु आश्रय द्या  ।।3.2



भव एव भवानिति मे नितरां समजायत चेतसि कौतुकिता
मम वारय मोहमहाजलधिं भव शंकर देशिक मे शरणम् ।।4

शिवशंभु तुम्हात भेद जरा परब्रह्मचि एक तुम्हीच मला
तव मोदमयी सहवास असा। सुखवी फुलवी मम चित्तलता।।4.1
अति मोहमयी भवसागर हा मज त्यातून आपण तारुन न्या
पथदर्शक सद्गुरुराज महा मम शंकर सद्गुरु आश्रय व्हा  ।।4.2



सुकृतेऽधिकृते बहुधा भवतो भविता पददर्शनलालसता
अतिदीनमिमं परिपालय मां भव शंकर देशिक मे शरणम् ।।5

पदरी बहु पुण्य जयास तया बहु ओढ असे चरणांचि  तुझ्या
दयनीय असे अति मी दुबळा मम पालन एक तुम्हीच करा।।5.1
पदपंकज हे तव वंद्य मला हृदयात  वसो नित ते अमला
पथदर्शक सद्गुरुराज महा मज शंकर सद्गुरु आश्रय व्हा  ।।5.2



जगतीमवितुं कलिताकृतयो विचरन्ति महामहसच्छलतः
अहिमांशुरिवात्र विभासि पुरो भव शंकर देशिक मे शरणम् ।।6

जग उद्धरण्या किति संत जगी। अवतारस्वरूपचि वावरती
परि सूर्य तुम्ही जगतास नवे उजळूनचि जीवनदान दिले।।6.1
पदपंकज हे तव वंद्य मला हृदयात  वसो नित ते अमला
पथदर्शक सद्गुरुराज महा मज शंकर सद्गुरु आश्रय व्हा  ।।6.2



 गुरुपुंगव पुंगवकेतन ते समतामयतां हि कोऽपि सुधीः
शरणागतवत्सल तत्त्वनिधे भव शंकर देशिक मे शरणम् ।।7

(पुंगव- श्रेष्ठ, सर्वोत्तम ; केतनम्  स्थान,ध्वज,पताका)

गुरुश्रेष्ठ सुश्रेष्ठचि स्थान तुम्ही ध्वज एक तुम्ही गुणवंत जनी
तवची सम एक तुम्हीच जगी सर ये कुणा तुमची लवही ।।7.1
अति वत्सल भक्तगणांवरती निजबोधसुधानिधि तत्त्वमयी
पथदर्शक सद्गुरुराज तुम्ही। मम आश्रयस्थानचि एक तुम्ही।।7.2



विदिता  मया विशदैककला किंचन काञ्चनमस्ति गुरो
द्रुतमेव विधेहि कृपां सहजां भव शंकर देशिक मे शरणम् ।।8

शिकलो पवित्रचि ज्ञान कला। मजपाशि कांचन किंचित वा
मज सोसवतो विलंब जरा। करणेचि कृपा सहजी त्वरिता।।8.1
पदपंकज हे तव वंद्य मला हृदयात वसो नित ते अमला
पथदर्शक सद्गुरुराज महा मज शंकर सद्गुरु आश्रय व्हा ।।8.2

--------------------------------

पौष शुद्ध 1, खरनाम संवत्सर./ 25 डिसेंबर 2011





1 comment: