।। यमुनाष्टकस्तोत्रम् ।।


।। यमुनाष्टकस्तोत्रम् ।।

(वृत्त – शिखरिणी, अक्षरे- 17, गण- य म न स भ ल ग)
कृपापारावारां तपनतनयां तापशमनीं
मुरारिप्रेयस्कां भवभयदवां भक्तवरदाम्।
वियज्जालान्मुक्तां श्रियमपि सुखाप्तेः प्रतिदिनं
सदा धीरो नूनं भजति यमुनां नित्यफलदाम् ।। 1
( पारावार – समुद्र. तपनतनया – सूर्याची मुलगी.  दवा – दावाग्नी. विय्यजाल – गगनमंडल. धीर- बुद्धिमान् ,प्रतिभाशाली )

असे ही कालिंदी सुखमय कृपेचाच जलधी
प्रिया ही कृष्णाची सकल जगिचा ताप शमवी।
असोनी पुत्री ही प्रखर तपत्या उग्र रविची
कृपावर्षावाने मुदित करिते भक्तजन ही ।। 1.1

जसा का दावाग्नी गवत करितो खाक पुरते
तसे कालिंदीचे जल भवभया भस्म करिते।
गमे स्वर्गातूनी अमल कमला ही अवतरे
जनांसी पुण्याची नित वितरते उत्कट फळे ।। 1.2

स्तुती वर्षावाने अखिल प्रतिभावंत भजति
पदी कालिंदीच्या सुजन जन हे आश्रय धरी ।। 1.3

( वृत्त – दुसरी सवाई / श्रवणाभरण  अक्षरे – 23, गण – न ज ज ज ज ज ज ल ग यति- 7,6,6,4)

मधुवनचारिणि भास्करवाहिनि जाह्नविसङ्गिनि सिन्धुसुते
मधुरिपुभूषिणि माधवतोषिणि गोकुळभीति-विनाशकृते।
जगदघमोचिनि मानसदायिनि केशवकेलिनिदानगते
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम् ।। 2

( मधुवन – गोकुळवृंदावनाच्या परिसरातून. भास्करवाहिनी – सूर्याची मुलगी. सिन्धुसुता- समुद्राची मुलगी लक्ष्मी. जगदघमोचिनि -  जगाचे पाप नष्ट करणारी. मधुरिपुभूषिणि – मधु दैत्याचा नाश करणार्‍या कृष्णाचे भूषण असणारी )

विहरत गोकुगाव वनातु जाय निरंत अल्लड ही
झुळझुळ वाह सूर्यसुता नि जाह्नविची प्रि हीच सखी
जलधिसुता कला प्रकटे जणु ही मधुसूद-भूषणची
सुखवितसे बहु माधव-चित्तचि, गोकुळही भमुक्त करी ।। 2.1

सकल जगासचि मुक्त करी भ,संकट,पाप रामधुनी
सकल अभीष्ट प्रदान करी; सुवी यमुने सलांस हृदी
जल तव निर्मल सुंदरसे घर मानुन गोपहि बागडती
चपल हरी, बलराम, सख्यांसमवेत करे जलक्रीडनही ।। 2.2

सकल भयासचि दूर करी अभयास प्रदान करे जननी
तव जल संकटमुक्त करे पथ कातरता नच ये हृदयी
जय जय हे यमुने जननी मज निर्मल शुद्ध पवित्र करी
जयजयकार त्रिवार असो तव कृष्णसखी तव कृष्णसखी ।। 2.3

भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 3.3

अयि मधुरे मधुमोदविलासिनि शैलविदारिणि वेगभरे
परिजनपालिनि दुष्टनिषूदिनि वाञ्छितकामविलासधरे।
व्रजपुरवासिनि-जनार्जितपातक-हारिणि विश्वजनोद्धरिके
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम् ।। 3

मधुर जले परिपूर्ण खळाळत जाय सवेग सखे मधुरे
परिमल धुंद करे तव तीरहि; नीर सुंगंधित हे अवघे
खळखळ हा जलओघ सवेग पहाड विशाल विदीर्ण करे
सुखमय जीवन देउन सेवक तोषविसी अति प्रेमभरे ।। 3.1

खल दुरितांस करूनचि शासन तू खलमुक्त करे अवनी
तव जल भक्तगणांस गमे जणु स्वर्ग दुजा धरणीवरती
अमल, पवित्र, अपाप करी जन गोकुळचे जननी सहजी
त्रिभुवन सुंदर तू करिसी जननी हरुनी भवदुःख भुवी॥3.2

भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 3.3



अतिविपदाम्बुधिमग्नजनं भवतापशताकुलमानसकं
गतिमतिहीनमशेषभयाकुलमागतपादसरोजयुगम्।
ऋणभयभीतिमनिष्कृतिपातक-कोटिशतायुतपुञ्तरम्
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम्॥4

( ऋणभय – देवऋण, धर्मऋण, देशऋण, पितृऋण इ. )

            हृदय बुडे मम दुःख विषादमयी जलधीत भयावह या           
शत शत खंड विदीर्ण मना भवताप न सोसवतो अवघा
मजसि उरे न विवेक जरा; मज आश्रयही दिसतो न कुठे
गतिमतिहीन अशा मजसी पदपंकज हे तव आश्रय गे ।। 4.1

बहु ऋणभार मला नच झेपत; माय सहाय्य करी मजला
निरसन शक्य नसेचि असे मम पाप सवेगचि ने विलया
भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 4.2


नवजलदद्युति-कोटिलसत्तनु-हेयमयाभर-रञ्जितके
तडिदवहेलि-पदाञ्चलचञ्चल-शोभितपीतसुचेलधरे।
मणिमयभूषण-चित्रपटासन-रञ्जितगञ्जितभानुकरे
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम्॥5
( सुचेल – सुंदर, भरजरी वस्त्र. हेलिः – क्रिडा, प्रेमालिंगन )

अगणित नील-छटा तव सुंदर; मेघ जसे जलपूर्ण नभी
चमचमती तव हेम तरंगचि भूषण हे तव रम्य अती
 जव बिलगे बिजलीच घना तव अद्भुत दृश्य दिसे गगनी
झगमगत्या पिवळ्या वसनास जरीपदरावर नक्षि तशी ।। 5.1

वसन तुझे बहुमूल्यचि सुंदर त्यावर भूषण रत्नमयी
लखलखते तव रत्नसुशोभित कांचन आसन हे रमणी
रवि-किरणांस नसे सरही तव; तेज फिकेच तुझ्यापुढती
जयजयकार त्रिवार असो तव कृष्णसखी तव कृष्णसखी ।। 5.2

भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 5.3

शुभपुलिने मधुमत्तयदूद्भव – रासमहोत्सव-केलिभरे
उच्चकुलाचल-राजितमौक्तिक-हारमयाभर-रोदसिके ।
नवमणिकोटिक-भास्करकञ्चुक-शोभिततारक-हारयुते
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम् ।। 6
( पुलिन -  पुळण, वाळू )
सुखद अशा पुळणीत तुझ्या किति रास अविस्मरणीय अति
हरि-बलराम-सख्यांसह रंगति त्यास नसे तुलना जगति
यदुकुलभूषण कृष्ण करे मधुपान सख्यांसमवेत तिरी
जलतनु ही कमनीय दिसे जणु मौक्तिकमाळ गिरीशिखरी ।। 6.1

चमचम सुंदर कंचुकि ही तव रत्नमणीयुत सोनसळी
जणु उगवेच नभी किति कोटि सहस्र रवी गमते मजसी
नभसुमने1 जणु गुंफुन उज्ज्वल हार गळा परिधान करी
जय जय हे यमुने जननी मज निर्मल शुद्ध पवित्र करी ।। 6 .2
( नभसुमन1- चांदण्या )
भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 6.3

करिवरमौक्तिक-नासिकभूषण-वातचमत्कृत- चञ्चलके
मुखकमलामल- सौरभचञ्चल-मत्तमधुव्रत-लोचनिके ।
मणिगणकुण्डल-लोलपरिस्फुरदाकुल-गण्डयुगामलके
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम् ।। 7
( करिवरमौक्तिक – हत्तिच्या गंडस्थळात उत्पन्न होणारा मोती. सर्व मोत्यांमध्ये तो सर्वात श्रेष्ठ समजला जातो. )

तव नथनीमधला गजमौक्तिक हालतसे हळु वायुसवे
मुदित करे हृदयांस  तयातुन हो परिवर्तित जी किरणे
अमल तुझे मुख हे कमलास सौरभस्वाद तयामधला-
नयन तुझे जणु चंचल भृंगचि प्राशन ते करतीच सदा ।। 7.1

डुलुडुलु हालति रत्नमयी तव कुंडल हे अति सुंदरसे
पसरति रंग-तरंग तयातुन गालि तुझ्या नवरंग खुले
भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 7.2

कल-रव-नूपुर-हेममयाचित-पादसरोरुह-सारुणिके
धिमिधिमिधिमिधिमि-तालविनोदित-मानसमञ्जुल-पादगते।
तव पदपङ्कजमाश्रित-मानवचित्त-सदाखिल-तापहरे
जय यमुने जय भीतिनिवारिणि सङ्कटनाशिनि पावय माम् ।। 8
( पादसरोरुह-सारुणिके – कमळासारखे आरक्त तळपाय असलेली. )

झनझन कांचन-पैजण वाजति ह्या कमलासम पायि तुझ्या
धिमिधिमि चाल तुझी गजगामिनि मोहक ही भुलवी हृदया
अरुण-पदी तव जे शरणागत त्यांस सदा भयमुक्त करी
जयजयकार त्रिवार असो तव कृष्णसखी तव कृष्णसखी ।। 8
भवभयलेश हृदी न वसो मम / मज संकटपार करी यमुने
जय जयकार असो जननी तव, ठेव कृपा जय हे जय हे ।। 8.2

(वृत्त – शिखरिणी, अक्षरे- 17, गण- य म न स भ ल ग)
भवोत्तापाम्बोधौ निपतितजनो दुर्गतियुतो
यदि स्तौति प्रातः प्रतिदिनमनन्याश्रयतया।
हयाह्रेषैः कामं करकुसुमपुञ्जै रविसुतां
सदा भोक्ता भोगान्मरणसमये याति हरिताम् ।। 9

कुणी संसाराच्या भयकर समुद्रात फसला
दिसेना आशेचा किरणच जयासीच कुठला
मनापासूनी तो जरि तव पदी येत शरणा
स्तुती स्तोत्रे गाई प्रतिदिनी तुझी सूर्यतनया ।। 9.1

तयाच्या दुःखाचे निरसन करे हे जल तुझे
गुरे, गायी घोडे पशुधन घरी त्या बहु झुले
तुरे हारांनी त्या सकल जन सन्मानित करे
सुखे भूलोकीची अनुपम सदा तो अनुभवे ।। 9.2

मिळे त्यासी विष्णू-पद सहज तो देह पडता
हरीरूपामध्ये मिसळुनिच तो जाय पुरता ।। 9.3
----------------------------------------------------
माघ शु. जया एकादशी / 30 जानेवारी 2015




No comments:

Post a Comment