।। प्रात:स्मरणस्तोत्रम् ।।



(वृत्त- वसंततिलका, अक्षरे  14, गण- त  भ ज ज ग ग, यति- पाद)

प्रात: स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
   सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम्।
: स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं
 तद् ब्रह्म निष्कलमहं भूतसङ्घ:।।1

( सत्- सदा सर्वकाळ ,तिन्ही त्रिकाळ असणारे,कधीही नाहिसे न होणारे ; चित्- ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप,सर्वसाक्षी; सुख - नित्य निरतिशय आनंदरूप ; परमहंस - सत्यरूप आत्मा  अणि मिथ्यास्वरूप देहादिस वेगळे करून आत्मतत्त्वाला प्राप्त करून घेणारे योगी जन ; तुरीय - स्थूल सूक्ष्म कारण अथवा जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडील चौथी अवस्था ; निष्कल  अवयवरहित )

जे आत्मतत्त्व स्फुरते हृदयी सदैव
त्याचे करी स्मरण मी अरुणोदयास
जे नित्य सत्य अविनाशिच सौख्यकारी
 तुर्यास्थितीच चवथी गति योगियांची।।1.1

जे जागृती, शयन, स्वप्न-दशेमधेही
साक्षीपणेचि बघते व्यवहार देही
ते ब्रह्म मीचि अवघे नच देह हा मी
 जो पंचभूत-समुदायचि तो नसे मी।।1.2



प्रातर्भजामि मनसां वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण।
यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः
तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम् ।।2

जेथेचि कुंठित मती  रसना मुकी ही
वाणीस जे खुलविते तिज स्फूर्ति देई
ऐसी कृपा अति निरंतर थोर ज्याची
 ते आत्मतत्त्व स्मरतो नित मी प्रभाती।।2.1

प्रत्येक वस्तु बघुनी वदतीच वेद
नाहीच हे ; नचचि ते; दिसे; गुप्त
नाकारुनी सकल वस्तु उरेची मागे
 ते आत्मतत्त्वचि खरे जग व्यापिते जे।।2.2

नाही जरा, जनन, मृत्यु जयास काही
होती क्रिया सकल; कारण त्या क्रियांसी
 ते आत्मतत्त्वचि असे नच अन्य काही
ते श्रेष्ठ तत्त्व परमेश्वर वंदितो मी।।2.3



प्रातर्नमामि तमस: परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम्।
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजङ्गम इव प्रतिभासितं वै।।3

मंद प्रकाश असता मनि भास होती
 रज्जूहि भासत असे जणु सर्प ऐसी
अज्ञान अभ्र मतिचे नच ज्ञान दावी 
आत्म्यावरीच प्रतिभासित होय सृष्टी।।3.1

अज्ञान संपुनि उरेचि प्रकाश जेथे
 ते आत्मतत्त्व स्मरतो नित मी पहाटे
देदिप्यमान जणु तेचि सहस्ररश्मी
सर्वत्र सर्वसमयी भरुनीच राही।।3.2

आहेचि शाश्वत सनातन नित्य जोची
 मी वंदितोचि पुरुषोत्तम तोच चित्ती।।3.3

-----------------------------------

नंदन नाम संवत्सर, मार्गशीर्ष कृ.चतुर्थी / 1 जानेवारी 2013



No comments:

Post a Comment