आत्मषट्कम्


मनोबुध्द्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायु-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥1

मनाहून आहे सदा वेगळा मी । नसे चित्त मी वा न बुद्धी कधीही
मना-बुद्धिला चालना जेच देई । असे विश्वव्यापीच चैतन्य ते मी॥ 1.1

     अहंता ममत्वासवे जोचि नांदे । वसे नित्य जो दंभ अज्ञानसंगे
नसे मी अहंकार ना दंभ तोची । असे जोचि जीवा महाक्लेशकारी॥ 1.2

नसे श्रोत्र मी वा नसे नेत्र दोन्ही । नसे नासिका मी न जिह्वा कधीही
न पृथ्वी न वायू न आकाश पाणी । न मी तेज वा पंचभूतेच कोणी॥ 1.3

कळे इंद्रियांसी न अस्तित्त्व माझे । मुनींच्याच बुद्धीमधे मी प्रकाशे
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 1.3

(जे चिंतन मनन करतात, ज्यांना आत्म प्रचिती आली आहे त्यांना मुनी म्हणतात)



न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर
न वा सप्तधातुर्न वा  पञ्चकोष:
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।।2

( प्राण-  प्राणवायू अथवा प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण  ; सप्तधातु - रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र (शरीराची धारणा करतात ते धातु) ; पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ( आत्म्याला झाकतात म्हणून त्यांना कोष म्हणतात.) ; पाच कर्मेंद्रिये -  हात,  पाय, तोंड गुद आणि उपस्थ (उपस्थ- जननेंद्रिये )

नसे प्राण वा मी नसे पंच वायू । नसे कोष पाची न वा सप्त धातू
नसे हात,पायादि कर्मेंद्रिये मी । न जिह्वा न वाचा न वाणीस्वरूपी॥ 2.1

कळेना कधी मीच बाह्येंद्रियांसी । हृदी प्रत्यया येतसे बुद्धिने मी
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 2.2



न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥3

नसे द्वेष आसक्ति वा लोभ काही । न स्पर्शे मला गर्व वा मत्सरादि
मला आस ना धर्म वा अर्थ याची । नसे अंतरी काम नाना विकारी ॥ 3.1

नको मोक्ष-मुक्ती अपेक्षा न त्याची । असे मुक्त मी मोक्षबंधातुनीही
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 3.2

(धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांच्या बंधनातून आत्मा हा मुक्त असतो. तो आत्मा हे माझे खरे स्वरूप आहे.)




न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥4

मला कोठले पाप वा पुण्य आता । मला सौख्य वा दुःख हे वेगळे ना
असे मन्त्रशक्तीच मी  सर्व थोर  । मला मंत्र आता कशाला हवेत ॥ 4.1

पवित्रास या तीर्थयात्रा कशास ।   समाविष्ट तीर्थेच माझ्यात देख
मला व्यापकाला न जाणेचि वेद ।  नसे वेद मी चारही ते समस्त।। 4.2

नसे यज्ञ वा यज्ञकर्ताच मीची । न यज्ञातुनी जी फळे प्राप्त होती
नसे अन्न मी वा न भोक्ता तयाचा । नसे वस्तु ती भोग ज्याचाच घ्यावा ॥ 4.3

घडाया क्रिया प्रेरणा एक मीची । जसा सूर्य साक्षी समस्ता क्रियांसी
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 4.4



 न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥ 5

नसे जन्म त्या मृत्युची काय भीती । असे शुद्ध मी त्या मला जात नाही
पिता कोठला माय ही ना कुणीही । न जन्मे तया संभवे नाचि नाती ॥5.1

नसे आप्त कोणी न भाऊ बहीणी । गुरू ना मला शिष्यही ना कुणीही
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 5.2



अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥6

नसे कोणता भेद माझ्या ठिकाणी । असे मीच भेदाचिया पार जाणी
भरोनी सदा सर्व विश्वात राहे । मला विश्वरूपास आकार नोहे॥ 6.1

जगी चालते सर्व सत्ताच माझी । सदा सर्व स्वाधीन ही इंद्रियेही
सदा प्रत्यया एकरूपात ये मी । मला बंधने मुक्ति ना लागु होती॥6.2

असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥6.3

-------------------------------------------------------


॥ वल्लभाचार्यकृत मधुराष्टकम् ॥


                एकदा कोणीतरी पुलंना कवितेची व्याख्या विचारली. आणि पुल म्हणाले `ज्यात कविता आहे ती कविता.' म्हणजे कवितेला वृत्तबंध असला पाहिजे, त्यात अनुप्रास यमक असलेच पाहिजे ह्या सर्व जोखडातून कविता मुक्त आहे. ती हृदयाला भिडली पाहिजे एवढी एकच गोष्ट असली पाहिजे. हे स्तोत्र वाचतांना आणि अनुवादित करतांना मला ते मनोमन पटले.  ह्या स्तोत्राची सुरवात तोटक वृत्ताने (वृत्त - तोटक, अक्षरे-12, गण- स स स स) केली आहे. दोन श्लोक झाल्यावर मात्र प्रत्येक चरणात 16 मात्रा या प्रमाणे स्तोत्र पूर्ण केले आहे. मधेच 5वे कडवे तोटकमधे आहे. तोटकमधे यति (स्तोत्र म्हणतांनाचा थांबा) पाद म्हणजे शेवटच्या अक्षरावर असते. ह्या तोटक वृत्तात यति 3, 6, 9,12 अशी आहे. मधेच एखादि ओळ तोटक वृत्तात आहे. असे असुनही सर्वच स्तोत्र अतिशय मधुर आणि प्रासादिक आहे. सर्वांचेच आवडते आहे. ह्या बहारदार स्तोत्राचा केलेला हा भावानुवाद. 


                                                                 Image result for free images of lord krishna     
अधरं मधुरं वदनं मधुरं 
नयनं मधुरं हसितं मधुरम्।
हृदयं मधुरं गमनं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥
( गमन - जाणे, गति, चाल, अभियान/ शत्रूवर हल्ला करणे, सहवास )

अधर मधुर तव । वदन मधुर तव । नयन मधुर तव । हास्य मधुरतर
हृदय तुझे रे । मधुर सुकोमल ।  लळा लावुनी । जाणे सुंदर
संगत सोबत । तुझी सख्या रे । अमृतमय  अति मधुर निरंतर
 शत्रूवरची । चाल मनोहर ।  मधुराधिपते सकल मधुर तव ॥1

Image result for free images of lord krishna

वचनं मधुरं चरितं मधुरं
वसनं मधुरं वलितं मधुरम्।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

बोल मधुरतर । कथा मधुरतम । वस्त्र रेशमी । तुझे मनोरम
खट्याळ नेत्री भाव मधुर तव । वळुनी बघता मन मोहे मम
डौलदार ही चाल मधुर तव । यमुनातीरी भ्रमण मधुर तव
मधुराधिपते सकल तुझे रे । मधुर मधुरतर मधुर मनोरम ॥2

Image result for free images of lord krishna
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः
पाणिर्मधुरः पादौ मधुरौ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

तव अधरीच्या स्पर्शानेही । वेणू बोले मधुर मधुर ही
पराग,रजकण माखुन अंगी । मूर्ती दिसे तव मधुर मधुरशी
मधुर तुझे कर , मधुर पावले । मधुर मधुर अति कोमल सुंदर
नृत्य तुझे हे सख्या मधुर रे । सख्य तुझे रे बरसे अमृत
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ॥3

Image result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishna
गीतं मधुरं पीतं मधुरं 
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम्
रूपं मधुरं तिलकं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

गानलुब्ध रे गीत मधुर तव । गोकुळातले दहि दुध प्राशन
गोप शिदोरी वाटुन खाणे । कमललोचना मधुर असे तव ।
 निद्राधीनचि रूप तुझे हे । लोभसवाणे मधुर गमे मज
तिलक भाळिचा मधुर दिसे तव । माधुर्याचे तूच मधुरपण
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ॥4

Image result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishna
करणं मधुरं तरणं मधुरं 
हरणं मधुरं रमणं मधुरम्।
वमितं मधुरं शमितं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

करशिल ते ते । मधुर असे तव । यमुना पोहुन जाणे सुंदर
दहि दुध चोरी मधुर असे तव । रमुनी जाणे तुझे मधुरतम
बोल मुखातुन जे जे येती । अमृतमय ते मधुर मधुरतम
चिंतनात वा गढुनी जाणे ।  शांत रहाणे तेहि मधुर तव
माधुर्याचा तूची गाभा । मधुराधिपती सकल मधुर तव ॥5

Image result for free images of lord krishna
गुंजा मधुरा माला मधुरा 
यमुना मधुरा वीची मधुरा।
सलिलं मधुरं कमलं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

रानफुलांची माळ सुंगंधी  । रुळते मधुरा तुझिया कंठी
त्यावर भुंग्यांची ही दाटी । मधुर गुंजनी गेली गढुनी
तुझ्या संगती येई जे जे । मधुर मधुरतम होई ते ते
मधुर असे अति कालिंदी ही । कृष्ण-तरंगे मधुर जाहली
सलिल मधुर हे  कमल मधुर हे । मधुराधिपती सकल मधुर तव ॥6
Image result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishna

गोपी मधुरा लीला मधुरा 
युक्तं मधुरं मुक्तं मधुरम्
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

हरिमय गोपी मधुर तुझ्या या । मधुर तुझा हा रास रंगला
गोपींसंगे रमुनी जाणे । मधुर दिसे तू त्यांच्या संगे
सहज सोडुनी जाणे त्यांना । मधुर असे रे तेही सखया
तुझे पहाणे गोड मधुर हे। शिष्टाई तव अनुपम सुंदर
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ॥7

Image result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishna
गोपा मधुरा गावो मधुरा
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा।
दलितं मधुरं फलितं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

गोप बालके मधुर तुझी ही । मधुरचि तांबू कपिला गायी
हाती काठी तव ही मधुरा । सृष्टी रचिली तू ती मधुरा॥
निर्दाळुन तू टाकी स्वकुला । कौरवसहिता कौरवसेना
आग लावुनी जाळी खांडव  । तेहि असे तव मधुरचि दर्शन ॥
विना याचना सुदाम्यास जे । दिलेस सुख ते अमर मधुरतर
पार्थालाही सखा मानुनी । केला तू उपदेश मधुरतर ॥
वस्त्र पुरविण्या पांचालीसी । धावुन येणे तुझे मधुरतम
कृपा असो वा क्रोध तुझा रे । मधुर माधवा अतिशय सुंदर
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ।।8
Image result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishnaImage result for free images of lord krishna
----------------------------------------------------------------------
(वैकुंठचतुर्दशी, दुर्मुखनाम संवत्सर, शके 1938, 13 नोव्हेंबर 2016)


कबीर


(मात्रा -16,12)

                        साधो सहज समाधि भली।
गुरुप्रताप जहँ दिनसे जागी, दिन दिन अधिक चली।।1
जहँ जहँ डोलौ सो परिकरमा, जो कुछ करौं सो सेवा।
जब सोवौं तब करौं  दंडवत, पूझौ और न देवा।।2
कहों सो नाम,सुनौ सो सुमिरन, खावौ पिवौ सो पूजा।
गिरह उजाड एक सम लेखौं,भाव मिटावौं दूजा।।3
आँख न मूँदौ,कान न रूधौं, तनिक कष्ट नधारौ।
खुले नैन पहिचानो हँसि हँसि, संदर रूप नाहारौ।।4
सबद निंतर से मन लागा, मलिन वासना त्यागी।
ऊठत बैंठत कब हूँ न छूटै, ऐसी तारी लागी।।5
कह कबीर यह उनमिनि रहनी, सो परकट करि गाई।
दुख सुख से कोई परे परमपद, तेहि पद रहा समाई।।6

(मात्रा -16,12)

                      साधो, सुगम समाधि बरी!
गुरु करणीची जादु विलक्षण,  प्रतिदिन रंगत न्यारी।।
कळे न मज परि काय जाहले, येता त्याची प्रचिती
सज्जन मी हो कैसे सांगू, सुख अनुपम मी भोगी।।
डोले मी जे, परिक्रमा ती, बोलचि होय स्तुती
घडेल हातुन ती ती सेवा, झोप, दंडवत पायी।।
पूजा नुरली आता मजला, देव दुजा ना नयनी
शब्द शब्द जिव्हा बोले ते, राम नाम सुखदायी।।
ऐके कान चि जे जे ते ते, ‘सुमिरन सुमिरन’ मजसी
खातो पीतो  तीची  पूजा,  असे नित्य नेमाची।।
रम्य गिरी ओसाड रान वा, समान भासे दोन्ही
उरला नाही भेदभावची । मनात माझ्या काही।।
मिटणे डोळे, कानी बोळे,  कष्ट जरा ना लागे
रूप हरीचे सुंदर पाही, हसत हसत नयनाने।।
नाम एक ते बसले चित्ती , मलिन वासना गेली
उठतो बसतो परि ना उतरे, लागे अशी समाधी।।
कबीर बोले ‘उन्मनि’ हीची, प्रकट आज झाली
सुख दुःखाच्या पलीकडे त्या, ‘परमपदी’ मी राही।।

(सुमिरन - नाम-स्मरण)



-----------------------------------------------------


यदि अल्लाह केवल मस्जिद में ही रहता हैं, तो
बाकी सारा देश किसका है?
हिन्दु कहते हैँ कि भगवान मूर्ति में हैं,
मुझे दोनो में सत्य नहीं दिखता।
हे भगवन् तुम अल्ला हो या राम, मैं तुम्हारे नाम
से ही जीता हूँ, मुझ पर कृपा करो।
हरि दक्षिण में है, अल्लाह पश्चिमें।
हृदय में खोजो, तो हृदयके अन्तस्तल
में उनको विराजित पाओगे।

(वृत्त मंदाक्रांता, अक्षरे -17, गण म भ न त त ग, यति -4,6,7.)

राहे अल्ला मशिदित जरी, देश बाकी कुणाचा?
हिंदुंचाही हरि वसतसे, मूर्तिमध्ये चि कैसा?
दोन्हीमध्ये मज न दिसते, तथ्य ते अल्प काही
मूर्ती किंवा मशिदित कसा देव कोंडून राही?।।
देवा तूची रहिम असु दे, राम वा अन्य कोणी
उच्चारीतो मधुर तव हे, नाम रात्रंदिनी मी
झाला त्याने सकल मम हा ,जन्मची धन्य लोकी
देवा राहो मजवर तुझी, सत्कृपा नित्य ऐसी।।
राहे विष्णू कुणि म्हणतसे, दक्षिणेला चि नित्या
अल्ला राहे, मजसि न कळे पश्चिमेसीच का त्या?
कैसा देवा मज दश दिशा शोधुनी सापडेना

शोधा यासी हृदयकमळी, हा विराजीत झाला।।

------------------------------------------------

  साखी

मात्रा -  13 (8+5)     11(8+3)

शिष्य पूजै गुरु आपना, गुरु पूजे सब साध

कहैं कबीर गुरु शीष कोमत है अगम अगाध ।। 1 ।।

शिष्य-हृदी  गुरु-पाऊलेसंतपदी गुरु ठाम

म्हणे कबीर गुरुशिष्य हे नित्य अगम्य अगाध ।। 1 ।।

शिष्य अनन्य भावाने आपल्या गुरूचे पूजन करत असतो तर गुरू असे साधुसज्जनांना सर्वभावसमर्पित असे पूजित असतो. कबीर म्हणतात, गुरु शिष्यांचा संबंध अगम्य आणि आगाध आहे. जनसामाम्यांना तो कळणार नाही.

----------------------------------------------------

देश दिशांतर मैं फिरूंमानुष बडा सुकाल

जा देखे सुख उपजै, वाका पडा दुकाल ।। 2 ।।

देशोदेशी भटकता, भेटे जनसंभार

पाहुन ज्याला सुख मिळे, दुर्मिळ ऐसा नार ।। 2 ।।

मी देशोदेशी भ्रमण करून खूप जग पाहिले. माणसांची कुठेच कमी नव्हती. माणसांचा सुकाळच होता. दुष्काळ होता तो फक्त त्या सज्जनांचा, ज्यांना पाहून मनामधे सुख, शांती  आपोआप उत्पन्न होईल.

----------------------------------------------------

स्वामी सेवक होय केमन ही में मिलि जाय

चतुराई रीझै नहींरहिए मन के मांय ।। 3 ।।

स्वामी सेवक होऊनीमिलन मनांचे होत

तेथे मखलाशी नको, एक विचार सुबोध ।। 3 ।।

जसे पाणी पाण्यात मिसळून जावे तसे स्वामी आणि सेवकाचे मन एकमेकात मिळून गेलेले असावे. तेथे चतुराई, मखलाशी कामास येत नाही. चतुराई दाखवून कोणी कोणाला वश करू शकत नाही. तेथे मनोमिलनच व्हावे लागते.

----------------------------------------------------

गुरु कीजै जानि के, पानी पीजै छानि

 बिना बिचारे गुरु करे, परै चौरासी खानि ।। 4 ।।

प्यावे पाणी गाळुनी,   गुरु करणे जाणुन ज्ञान

विना विचार करता गुरू,  नित दुःखाची खाण ।। 4 ।।

----------------------------------------------------

गुरु तो ऐसा चाहिए, शिष सों कछु लेय

शिष तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय ।। 5 ।।

 गुरू असावा असा भला , मागे अल्प मोल

शिष्य असावा असा भला सर्वस्व देइ मोल

 

----------------------------------------------------

गुरु भया नहिं शिष भया, हिरदे कपट जाव

आलो पालो दुख सहै,  चढि पाथर की नाव ।। 6 ।।

गुरु भला ना शिष्य भला असता कपट मनात

ऐल-पैल ना पोचवी  दुःखद दगडी नाव ।। 6

जोपर्यंत हृदयात कपट आहे, मनात मखलाशी आहे, पोटात काळेबेरे दडले आहे तोपर्यंत तो गुरू गुरू नाही आणि शिष्य शिष्य नाही. अशी परिस्थिती दोघांसाठीही दुःखद, विनाशाला कारण ठरते. जसे दगडी नावेत चढून (अज्ञान, मोह, मत्सर रूपी नावेत चढून ) ऐलतीर पैलतीर असा (भवसागराचा )कुठलाच तीर गाठता येत नाही.

----------------------------------------------------

ऐसा कोई ना मिलाजासू कहूं निसंक

जासो हिरदा की कहूं, सो फिर मारे डंक ।। 7 ।।

ज्याच्यापाशी हृदय हे उघडावे मी निःशंक

कोणी मज ना भेटला वर मारे मज डंख ।। 7 ।।

ज्याच्यापाशी निःशंकपणे आपलं मन मोकळं करावं असा आधार प्रत्येक माणूस शोधत असतो. माणूस आपलेपणाने ज्याला आपली व्यथा सांगावयास जातो तो ती हसण्यावारीतरी नेतो, त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी त्याची उपेक्षा तरी करतो नाही तर त्या दुःखिताचा बरा भेद कळला म्हणून गैरफायदा घेऊन  त्यालाच अशी काही अद्दल घडवतो की त्याला कुठून  आपण आपले मन मोकळे केले असे वाटावे. म्हणून कबीरजी म्हणतात, कोणाजवळ मन मोकळ कराव असा मला एक माणूस सापडला नाही. सर्व जण सापासारखे डंख मारणारेच होते.

----------------------------------------------------

ऐसा कोई ना मिला, हम को दे उपदेश

भवसागर में डूबते , कर गहि काढे केश ।। 8

आजवरी नच भेटला, हित सांगे जो खास

केस धरुन काढे वरी, भवाब्धितुन बुडत्यास ।। 8 ।।

----------------------------------------------------

हिरदे ज्ञान उपजै, मन परतीत होय

ताको सद्गुरु कहा करे, घनघसि कुल्हर होय ।। 9

ज्ञानज्योत उजळे हृदि ,  परतत्त्व  स्पर्शे ज्यास

 त्यासी सद्गुरु काय करे, ढग घासुन कुर्हाड खास ।। 9 ।। 

----------------------------------------------------

जिन ढूंढ़ा तिन पाइयां, गहरै पानी पैठ

मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ ।। 10

तटी बसुन मोती मिळे , म्हणतो पाणी खोल

तटी बसुन मी बापुडा , बुडेन म्हणतो खोल

----------------------------------------------------