नानकजींनी केलेली जगन्नाथाची आरती

श्री नानकजी जगन्नाथ पुरीला गेले असता त्यांना देवळात प्रवेश नाकारला गेला. तेंव्हा तेथील पायरीवर बसून त्यांनी श्री जगन्नाथाची म्हटलेली ही आरती खूप सुंदर आहे.


गगनमें थालु रविचन्दु दीपक बने,
तारिका मण्डल जनक मोती।
धुपु मलयानलो पवणु चँवरो करे,
सगल बनराइ फूलन्त जोती।।
कैसी आरती होइ भवखण्डना तेरी आरती,
अनाहता सबद बाजन्त भेरी।।
 सहस तव नैन नन नैन हहि तोहि कउ
सहस मूरति नना एक तोही।।
सहस पद विमल नन एक पद गंध बिनु,
सहस तव गंध इव चलत मोही।
सभ महि जोति ज्योति है सोई,
तिसदे चानणि सभ महि चनणु  होई।।
गुरु साखी जोति परगटु होई,
जो तिसु भावे सु आरती होई।
हरिचरण मकरंद लोभित मनो,
अन दिनों मोहिं आही पिआसा।।
कृपाजल देहि ‘नानक’ सारिंग कउ
होइ जाते तेरे नाउ वासा।।

(प्रत्येक चरणात साधारण 7 शब्द, `आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा'च्या चालीवर- -)

गगनाच्या  तबकात ।  दीप सूर्य चंद्र दोन्ही । तारका-गण सारे । जैसे ठेवियले मोती
मलय गिरीचा हा  । धूप चंदनगंधी  । आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।1
पवन चौऱया ढाळी । जगन्नाथा तुजवरी । लाख लाख सुमनांनी। वनराई फुले ही।
जणु या उजळती । कशा लख लख ज्योती ।आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।2
नाद हा अनाहत । घुमे ओंकाररूपी । हृदया मम व्यापी। त्याचा मंजूळ ध्वनी।
जणु या वाजताती । भेरी तुझ्याच साठी । आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।3
नेत्र सहस्र तुझे । हे जग निरखिती । लोक तरी वदती । तुज नयने नाही
सहस्रावधि मूर्ति । त्यात एकच तूची । आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।4
निर्मळ पदकमळे। किति सहस्र जाणी । एकची गंध परी। त्यात तुझाच येई
गंध ची  तो हृदयी । दरवळे तुझाची। आरती तव कैसी ।  हे  भवभय-हारी।।5
जड चेतन सृष्टी । त्यात चैतन्य रूपी । प्रकटे तव ज्योती । जी चालवी त्यांसी
विश्व सकल चाले  । देवा कृपा तुझी ही । आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।6
गुरूच्या उपदेशे । फिटे अंधार जाळे। मन सारे उजळे । ज्ञान ज्योत पाजळे
श्रद्धा अढळ धरी । गुरु वचनावरती । आरती तीच खरी । हे भवभय हारी।।7
हरिच्या पदकमळी । मधुमकरंद पाही । आलो मी भुलुनी। जणु चातक पक्षी
व्याकुळ तहानेने ।  आता कोठे न जाई । आरती तव कैसी  । हे  भवभय-हारी।।8
नानक तहानेला । कृपाजल त्या देई । ठेवी तव चरणी । ही विनंती पायी

रूप तुझे बघुनी । द्वैत उरले नाही । आरती हीच खरी । हे भवभय-हारी।।9

No comments:

Post a Comment